अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आले होते. कार्यक्रमाच्या प्रसंगी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र सोडलं. ‘काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता संजय राऊत यांच्यावर टीका केली.
उद्धव गटाचे नेते संजय राऊत नेहमीच विविध मुद्द्यांवरून शिंदे-फडणवीस सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतात. मात्र संजय राऊत यांच्या टीकेला सत्ताधारी पक्ष देखील सडेतोड उत्तर देताना दिसतात. संजय राऊत यांच्याकडून लवकरच सरकार कोसळणार असल्याचा दावा केला जातो. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ‘काही लोक सकाळी नशा करून कुस्ती खेळतात’, असा टोला फडणवीसांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
अहमदनगर येथे छत्रपती शिवराय केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती स्पर्धेच्या समारोपला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपस्थिती राहिले होते. यावेळी फडणवीस यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. फडणवीस म्हणाले की, “राजकारणामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक सकाळी नऊ वाजता नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात. पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं. जे असली मातीचे पैलवान असतात, तेच कुस्ती जिंकतात,” असा टोला नाव न घेता संजय राऊतांना लगावला. पुढे फडणवीसांनी “तुमच्या आशीर्वादाने आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे. 2024 ला पुन्हा जिंकू, तुमचा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहू द्या,” असा विश्वासही व्यक्त केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.