दहीहंडीच्या कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्य वादग्रस्त वक्तव्याबद्दल आमदार राम कदमांनी माफी मागितली आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने स्युमोटो दाखल करुन घेतली असून आठ दिवसात आपली बाजू मांडण्याचे आदेश राम कदम यांना दिले होते.
चौफेर टिकेनंतर राम कदम यांनी ट्विटरच्या माध्यमातून मागितली आहे. वादानंतर राज्यभरात कदम यांच्याविरोधात महिलांनी आंदोलनं केली तर सर्व स्तरातून त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत होती.
माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून माझ्या राजकीय हितशत्रूंनी जो वाद निर्माण केला त्यामुळे माता-भगिनींची मनं दुखावली . झाल्याप्रकरणी मी वारंवार दिलगिरी व्यक्त केली. पुनःश्च
माता-भगिनींचा आदर करत मी माफी मागत आहे.@ANI — Ram Kadam (@ramkadam) September 6, 2018
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.