डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. मात्र, ही निवडणूक नेहमीसारखी गुप्त मतदानाऐवजी आवाजी मतदान पद्धतीने होणार असल्याचे खात्रिलायकरित्या समजत आहे.
२२ डिसेंबर रोजी पार पडणाऱ्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विधानसभा नियम समितीची बुधवारी बैठक पार पडली, त्यात विधानसभा अध्यक्षांच्या निवडीचा नियम बदलण्यात आला असून, आता आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड करण्यात प्रस्ताव तयार करण्यात आला. तसेच गुप्त मतदानाऐवजी उघड पद्धतीने मतदान करण्याच्या प्रस्तावास हिवाळी अधिवेशनात मंजूरी मिळाल्यास विधानसभा अध्यक्ष निवडीचा मार्ग सुकर होणार आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.