Thane MLC Election : शेवटच्या क्षणी ठाण्यात नाट्यमय घडामोड! ठाणे विधानपरिषदेत रविंद्र फाटक यांचा मार्ग मोकळा

आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. असं असताना ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे.
Thane MLC Election : शेवटच्या क्षणी ठाण्यात नाट्यमय घडामोड! ठाणे विधानपरिषदेत रविंद्र फाटक यांचा मार्ग मोकळा

आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. असं असताना ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. ठाणे-पालघर विधानपरिषदेत मविआच्या उमेदवाराने आपला अर्ज मागे घेतल्यामुळे शिंदेंचा रस्ता मोकळा झाला आहे. शिंदेंच्या शिलेदाराने बिनविरोध विजय मिळवला आहे. त्यामुळे हा मविआसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 

ठाणे विधानपरिषद फाटक यांचा मार्ग मोकळा
ठाणे-पालघर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी शिवसेना शिंदे गटातील नेते रवींद्र फाटक यांनी उमेदवारी जाहीर झाली होती. तसेच मविआकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अभिजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. या जागेसाठी महायुतीतील अंतर्गत रस्सीखेच व्यतिरिक्त कोणतीच बंडखोरी किंवा अपक्ष उमेदवाराने अर्ज भरला नव्हता. पण अचानक यात एक मोठा ट्वीस्ट समोर आला.

हेही वाचा- NCP-Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमकं काय घडतंय? बड्या नेत्याने घेतली शरद पवार यांची भेट

महाविकास आघाडीकडून रिंगणात असलेले एकमेव विरोधी उमेदवार अभिजित पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे, ठाणे मतदारसंघाची विधानपरिषद निवडणूक आता पूर्णपणे बिनविरोध होणार आहे. ठाणे विधानपरिषद निवडणुकीत कोणत्याच प्रकराची पक्षांतर्गत बंडखोरी होणार नव्हती तर ही लढत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी होणार होती. मात्र अभिजित पवार यांनी मी माझ्या वैयक्तिक कारणांमुळे हा उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याची माहिती देत आपला अर्ज मागे घेतला.  

नाशिक विधानपरिषदेत हायव्होल्टेज ड्रामा
नाशिक विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीचा टेन्शन वाढल आहे. भाजपाचे बंडखोर उमेदवार गोकुळ गीते नॉट रिचेबल झाले आहेत. गणेश गीते आज मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर माघार घेणार असले तरी गोकुळ गीते पात्र निवडणुकीच्या रिंगणात कायम राहणार का याकडे लक्ष लागले आहे. गोकुळ गीते नॉट रिचेबल झाल्याने नाशिकच्या निवडणुकीत सस्पेन्स वाढला आहे. याचपार्श्वभूमिवर मंत्री गिरीश महाजन देखील नाशिकच्या दिशेने रवाना झाल्याची सूत्रांची माहिती आहे. भाजपचे उमेदवार गणेश गीते यांच्या बंडखोरीचा मोठा फटका हा शिवसेना शिंदे गटाला बसण्याची शक्यता आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version