Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणींना आता 1500 नाही…’; नगरपरिषदेच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

राज्यातील 288 नगराध्यक्षपदांपैकी तब्बल 214 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या यशाचे विश्लेषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजने'चा प्रभाव अधोरेखित केला.
Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहिणींना आता 1500 नाही…’; नगरपरिषदेच्या विजयानंतर एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीने मिळवलेल्या देदीप्यमान यशानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. 'लाडक्या बहिणींना दिलेला शब्द आम्ही पाळणार असून, सन्मान निधी 2100 रुपये करणारच,' असे ठाम आश्वासन शिंदे यांनी विजयाचा जल्लोष साजरा करताना केले.

नगरपरिषद निवडणुकीत महायुतीचा 'क्लीन स्वीप'

राज्यातील 288 नगराध्यक्षपदांपैकी तब्बल 214 जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. या यशाचे विश्लेषण करताना एकनाथ शिंदे यांनी 'लाडकी बहीण योजने'चा प्रभाव अधोरेखित केला. शिवसेनेच्या (शिंदे गट) आजवरच्या इतिहासात पहिल्यांदाच 57 नगराध्यक्ष निवडून आले असून, पक्ष राज्यात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या यशाचे श्रेय त्यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि राज्यातील महिला शक्तीला दिले आहे.

हेही वाचा – Local Election Result: 'काँग्रेसने भाजपची बी-टीम म्हणून..'; निवडणुकांच्या निकालानंतर रोहित पवारांची खरमरीत प्रतिक्रिया

2100 रुपयांचा शब्द पाळणार – एकनाथ शिंदे 

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने लाडकी बहीण योजनेचा निधी 1500 रुपयांवरून 2100 रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, 'अनेकांनी ही योजना बंद पाडण्याचे प्रयत्न केले, मात्र आम्ही सर्व अडथळे दूर करून ती यशस्वी केली. आता कोणताही 'माईचा लाल' ही योजना बंद करू शकणार नाही. आम्ही बहिणींना दिलेला शब्द विसरलेलो नाही. योग्य वेळी लाडक्या बहिणींचा सन्मान निधी 2100 रुपये केला जाईल.'

हेही वाचा – Sudhir Mungantiwar On Devendra Fadnavis: 'पक्ष नेतृत्वानेच गटबाजीला खतपाणी घातलं…'; मुनगंटीवारांची देवेंद्र फडणवीसांवर टीका

अडीच वर्षांच्या स्थगितीचा काळ संपला

महाविकास आघाडीवर टीका करताना शिंदे म्हणाले की, मागील सरकारने विकासाच्या कामांना स्थगिती देऊन महाराष्ट्राची प्रगती थांबवली होती. आम्ही केवळ स्थगिती उठवली नाही, तर लेक लाडकी, मोफत उच्च शिक्षण आणि आरोग्य विमा यांसारख्या लोककल्याणकारी योजना राबवून राज्याला पुढे नेले आहे.
 
 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version