भूकंपानं तुर्की आणि सिरीया हादरलं

भूकंपानं तुर्की आणि सिरीया हादरलं

तुर्की आणि सीरिया एकापाठोपाठ एक भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं आहे. तुर्की, सीरियात ४० हून अधिक भूकंपाचे धक्के बसले आहेत. सोमवारी सर्वात जास्त ७.८ तीव्रतेचा भूकंपाचा झटका बसला. यामुळे अनेक जणांचा मृत्यू झाला असून हजारो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. भारताने तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी भूकंपामध्ये मृत्यू झालेल्या लोकांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तुर्की आणि सीरियामध्ये भूकंपाचे अनेक धक्के बसले आहेत, त्यातच हवामान बदलामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत.

एकापाठोपाठ एक झालेल्या छोट्यामोठ्या ७८ धक्क्यांनी १७०० पेक्षा जास्त इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. गाझियान्टेपसह लेबेनॉन, सायप्रसलाही भूकंपाचा मोठा फटका बसला आहे. उत्तर सीरियातल्या अलेप्पो आणि हमा या शहरांमध्ये भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या आहेत.

तुर्कस्तानच्या सॅनलिउर्फा प्रांतातही एका महिलेला २२ तासांनंतर जिवंत बाहेर काढण्यात आले. बचाव पथकाला ही महिला बेशुद्ध अवस्थेत सापडली. दुसरीकडे, सीरियातील अलेप्पोमध्ये इमारतींचे छत कापून लोकांना बाहेर काढले जात आहे. दोन्ही देशांतील अनेक शहरांमध्ये हेच दृश्य आहे. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे चार हजारांहून अधिक इमारती कोसळल्या आहेत. ज्यामध्ये दबून मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अंदाज आहे की या भूकंपात २० हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

मदत आणि बचाव कार्य सुरू असून भारतासह जगातील अनेक देशांनी तुर्कस्तानला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने श्वानपथकासह एनडीआरएफच्या दोन तुकड्या तुर्कीला पाठवल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय साहित्यही पाठवण्यात आले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version