जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर
देशाला दरवर्षी सुमारे 41 हजार कोटी रुपयांचे इंधन आयात करावे लागतं. या आयातीला पर्याय असलेल्या इलेक्ट्रिक वाहन युगाची सुरुवात शुक्रवारी नागपुरातून झाली. या ई-वाहन युगाचे नागपूर हे प्रवर्तक ठरलं.
देशात विजेवर चालणारी पहिली टॅक्सीची सुविधा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीत नागपूरात सुरू झाली. ओला कंपनीने 200 विजेवर चालणाऱ्या गाड्या पायलट प्रोजेक्टच्या रूपाने नागपूरच्या रस्त्यावर उतरवल्या. महिंद्राने अशा इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या गाड्यांची निर्मिती सुरू करून या क्षेत्रात नव्या युगाची सुरुवात केली.
महिंद्रा अॅण्ड महिंद्राने तयार केलेल्या गाड्या
पहिल्या टप्प्यात 200 ऑटो व चारचाकी गाड्यांचा समावेश
एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केली की 140 कि.मी.चा प्रवास
नागपुरात चार चार्जिंग स्टेशन
13 जलद चार्जिंग स्टेशन
प्रवाशांसाठी 8 रुपये प्रती कि.मी. दर
सामान्य ओला कॅब बुक करण्यासारखीच पद्धत
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.