न्यायालयाने डीसकेंचा जामीन अर्ज फेटाळला; पासपोर्ट जप्त करण्याचे दिले आदेश

न्यायालयाने डीसकेंचा जामीन अर्ज फेटाळला; पासपोर्ट जप्त करण्याचे दिले आदेश

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं मोठा दणका दिलाय. पैसे परत करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा करणाऱ्या डीएसकेंना अटकेपासून दिलेलं संरक्षण आज न्यायालयानं काढून घेतलं. तसेच, त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेशही संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळं डीएसकेंना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयानं डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळला आहे. डीएसकेंचा जामीन अर्ज फेटाळला असून त्यांच्या जामिनावर 22 फेब्रुवारीला अंतिम निकाल लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version