…म्हणून डी एस केंना रुग्णालयात दाखल केले

…म्हणून डी एस केंना रुग्णालयात दाखल केले

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे  

बांधकाम व्यावसायिक डीएस कुलकर्णी यांची प्रकृती बिघडली असल्याची माहिती आता समोर येतेय. पोलीस कोठडीत असणाऱ्या डीएसकेंची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पोलीस कोठडीत पडल्याच्या संशयावरुन गंभीर जखमी झालेल्या डीएसकेंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. दरम्यान, डीएसकेंवर आता आयसीयूमध्ये उपचार करण्यात येत आहेत. तपासणी दरम्यान,  सीटी स्कॅन, MRI रिपोर्टस नॉर्मल आले असून ब्रेन हॅमरेज नसल्याची माहिती समोर येतेय.

ग्राहकांना घर न देणे आणि करोडोंचा गंडा घातल्याचा आरोप डी एस कें वर आहे. तसेच, बॅंक ऑफ महाराष्ट्रची जमीन बुलडाणा को-ऑपरेटिव बॅंकला विकल्याचाही आरोप डी एस कें वर आहे. त्यावर न्यायालयाने त्यांना तात्काळ 50 करोड भरण्यास सांगितले होते. मात्र, डी.एस.केंनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले नाही. अखेर त्यांना पुणे पोलिसांनी सहपत्नी अटक केली. दरम्यान पोलीस कोठडीत प्रकृती खालावल्यामुळे डी एस केंना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version