मद्यपान केलेल्या तरुणांचा धिंगणा, जीव वाचवण्यासाठी हवेत केला गोळीबार

मद्यपान केलेल्या तरुणांचा धिंगणा, जीव वाचवण्यासाठी हवेत केला गोळीबार

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 अमरावतीमधील सर्किट हाऊसजवळच्या परिसरात दारूच्या नशेत काही तरुणांनी चांगलाच धिंगाणा घातलाय. शनिवारी रात्रीच्या वेळी लघुशंका करतांना हटवलं म्हणून या मद्यपींनी एका तरुणावर हल्ला केला. अनिकेत देशमुख या तरुणाला यावेळी त्यांनी बेदम मारहाण केली. यावेळी त्या तरुणाने स्वत:चा बचाव करण्यासाठी घरातील रिव्हॉर्ल्वरमधून हवेत गोळीबार केला. यानंतर परिसरातल्या संतप्त नागरिकांनी चौघा मद्यपींना बेदम मारहाण केली. यात दोन्ही गटातील 7 जण जखमी झालेत. तर या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version