Dharashiv Naldurg Fort Tragedy : मोठी बातमी! धाराशिवच्या नळदुर्गच्या किल्ल्यावरून तीन मुलासह आईने घेतली उडी; नेमके कारण काय?

धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे. धाराशिवच्या नळदुर्गच्या किल्ल्यावरून आईने आपल्या तीन मुलांसह उडी घेतली आहे.
Dharashiv Naldurg Fort Tragedy : मोठी बातमी! धाराशिवच्या नळदुर्गच्या किल्ल्यावरून तीन मुलासह आईने घेतली उडी; नेमके कारण काय?

नुकतीच घरगुती कलहामुळे छत्रपती संभाजीनगर येथील खवड्या डोंगरावरून एकाच कुटुंबातील तिघांनी उडी मारली होती. मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या वडिलांचा तोल जाऊन दोघेही खोल दरीत कोसळले. त्यांना असं पाहून आईने देखील दरीत उडी घेतली. या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली होती. हे प्रकरण ताजं असतानाच धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी बातमी समोर आली आहे.

हेही वाचा- Ambernath Video Viral : समोरून ट्रेन आली, तरी जीव मुठीत घेऊन ट्रॅकवर उतरला! दिव्यांग व्यक्तीचा जीव धोक्यात घालणारा प्रकार

धाराशिवच्या नळदुर्गच्या किल्ल्यावरून आईने आपल्या तीन मुलांसह उडी घेतली. यादरम्यान आईसह एका मुलाचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुले जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील वंताळा येथील अश्विनी तानाजी मोहिते असं मृत महिलेचे नाव असून अश्विनी मोहिते तीन लहान मुलांसह किल्ला परिसरात आल्या होत्या. किल्ल्याच्या उंच तटबंदीवरून खाली पडल्याने अश्विनी मोहिते आणि एका मुलाचा मृत्यू झाला.

तर दोन मुले जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच नळदुर्ग पोलिस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. दरम्यान त्या महिलेने पोटच्या तीन लहान लेकरांसह नळदुर्ग किल्ल्यासारख्या उंचावरून उडी मारून इतके टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तर पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या भीषण घटनेमुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version