जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्याचं नाव घेत नाहीये. याचसंदर्भात विधान परिषदेतले विरोध पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ट्विट करत किती शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या याबद्दल माहिती दिलीये.
कर्जमाफी जाहीर झाल्यापासून 4 महिन्यात 1020 आणि या वर्षात 10 महिन्यात 2414 आत्महत्या झाल्या आहेत. कृषी विकासाच्या बोगस आकडयांची जाहिरातबाजी करणारे सरकार या दुर्दैवी आत्महत्यांचीही जबाबदारी का घेत नाही ? असा सवाल त्यांनी केला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.