हनुमान जयंतीचा उत्सव सर्वत्रच उत्साहात साजरा केला जात असताना हनुमानाच्या जन्मगावी अर्थातच नाशिकच्या अंजनेरीमध्ये तर पहाटेपासूनच भाविकांनी मारूतीरायाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय. त्र्यंबकेश्वरजवळ असलेल्या अंजनेरी डोंगरावर वायुपुत्र हनुमानाचा जन्म झाला आणि म्हणूनच या किल्ल्याला अंजनेरी नाव देण्यात आले अशी आख्यायिका आहे. रामनवमीपासूनच येथे उत्सवाच्या तयारीला सुरुवात करण्यात येते. मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली असून मुर्तीला महावस्त्र परिधान करण्यात आले आहे. जय हनुमान, रामभक्त हनुमानकी जयच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमुन गेला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.