इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी -देवेंद्र फडणवीस

इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी -देवेंद्र फडणवीस

विरोधकांचे फोन टॅप करणं ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. आमच्या सरकारने तसे कोणतेही आदेश दिलेले नव्हते. असं प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.

तत्कालीन सरकारमध्ये विरोधकांचे फोन टॅप होत असल्याची माहिती आपल्याला खुद्द भाजपच्याच एका नेत्याने दिली होती, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यावर ही दुसऱ्यांच्य़ा घरात डोकावून पाहयची विकृती आहे, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. त्याला फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले फडणवीस?

या प्रकरणात ज्यांनी तक्रार केली आहे, त्यांची राजकारणातील विश्वसनीयता ही संपूर्ण देशाला ठावूक आहे.

राज्य सरकारला ज्या कोणत्या यंत्रणेमार्फत चौकशी करायची असेल, ती करायला ते मोकळे आहेत.

सत्य महाराष्ट्राच्या जनतेला ठावूक आहे.

शिवसेनेचे मंत्री सुद्धा त्या काळात गृहराज्यमंत्री होतेच.

माझी एकच विनंती आहे की, तत्काळ चौकशी करून त्याचा अहवाल राज्याच्या जनतेपुढे ठेवावा. इस्त्रायलला जाऊन चौकशी करायची असेल तर तीही करावी, असा टोला त्यांनी लगावला.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version