क्रुझवरी ड्रग्जप्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. याच ड्रग्जप्रकरणावरून आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आमनेसामने येणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत जनतेला संबोधित केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी हिंदीभाषेतून पत्रकार परिषदेला सुरूवात केली. तसेच त्यांनी सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल कोण आहेत? या बाबत खुलासा केला आहे.
सरदार शाहवली खान हा १९९३मधील बॉम्बस्फोटातील आरोपी आहे. सरदारने मुंबई शेअर बाजार आणि मुंबई महापालिकेत बॉम्ब परेणीची रेकी केली होती. त्याला जन्मठेपाची शिक्षा सुनावण्यात आली असून सरदार खान आता तुरुंगात आहे. सरदार खान हा मेननच्या नेतृत्वाच्या कटात आणि आरडीएक्स पेरण्याच्या कामात सहभागी असल्याचा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेच देशाच्या सुरक्षेसाठी ही महत्त्वाची माहिती असल्याचे त्यांनी सांगितले.
सलीम पटेल हा देशाचा गुन्हेगार आहे. सलीम पटेल हा हसीना पारकरचा बॉडीगार्ड तसेच दाऊतचा निकटवर्तीय होता. सलीम पटेल हा हसीना पारकरचा सर्व कारभार सांभाळायचा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.