Devendra Fadnavis On Narhari Zirwal : "त्या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचं नाव नाही" फडणवीसांकडून झिरवाळांना क्लिनचीट

अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली आहे. 
Devendra Fadnavis On Narhari Zirwal : "त्या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचं नाव नाही" फडणवीसांकडून झिरवाळांना क्लिनचीट

मंत्रालयातील राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विभगाच्या कार्यालयात लाचखोरीचा गंभीर प्रकार समोर आला. या प्रकरणानंतर झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली जात आहे. यानंतर अन्न आणि औषध प्रशासन खात्यातील लाचखोरी प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्री नरहरी झिरवाळ यांना क्लिनचीट दिली आहे. 

हेही वाचा- Mumbai BMC elections : राजकीय घडामोडींना वेग! मनसेला दोन महत्त्वाच्या पदांची लॉटरी; राज ठाकरेंची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “जर एखादी तक्रार मिळाली तर देवेंद्र फडणवीसच्या केबिनमध्ये रेड होईल. मी एसीबीला पूर्ण सूचना दिल्या आहेत एखादी तक्रार आली तर, तुम्ही न विचारता कारवाई करा. आम्ही समन्वयने चालू आहेत त्यामुळे असे कारभार करण्याची आम्हाला गरज नाही. या अधिकाऱ्यांच्या बदली झाली त्याच्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही. या प्रकरणामध्ये कुठेही मंत्र्याचं नाव आलं नाही. अशी घटना घडली तर राज्य सरकारच्या प्रतिमेला धक्का बसतो. समजल्याबरोबर कारवाई करणे हा त्यावरचा उपाय आहे. व्हॉइस रेकॉर्डर मध्ये प्रत्यक्ष वेळी काय घडत होती त्याची माहिती मिळेल. व्ही एस आर हे एजंट आहेत. वेगवेगळे लोक ती कंपनी चालवतात. गेल्या काही महिन्यांमध्ये व्हीएसआर सर्वात मोठा ऑपरेटर झाला आहे. घाबरून घाबरून आमची चाळण झाली आहे. विधानसभा अध्यक्षांवर कुठल्याही प्रश्नचिन्ह नाही”.

हेही वाचा- Budget Session : राज्याच्या विकासाचा तिहेरी अजेंडा! AI, उद्योग, पायाभूत सुविधा आणि कर्जमाफीवर विशेष भर; अर्थसंकल्पात काय असणार?
नेमकं प्रकरण काय?
मंत्री नरहरी झिरवाळ यांचा मंत्रालियन क्लार्क राजू ढेरंगे यांनी लाज घेतलेल्या प्रकरणातील स्टिंग ऑपरेशन व्हिडिओ समोर आलं आहे. त्यामध्ये ढेरेंगे आणि पीए रामदास घाडी दोघेही दिसून येत आहेत. तसेच 50 हजारांची लाज मागितल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. कामासाठी येणाऱ्या नागरिकांच्या फाईलवर एक लाइन आखली जाते ज्याचा अर्थ हा 50 हजार रुपये घेणे असा आहे. तर दोन लाइन आखले म्हणजे 1 लाख रुपये घेणे अशाप्रकारे लोकांकडून पैसे घेणे सुरू असल्याचे निर्मल शर्मा यांनी सांगितले. तसेच इतके पैसे नसेल तर 50 टक्के डिस्काउंट देतो असा घाडी म्हणाले आहेत. त्यामुळे या प्रकरणात रामदास घाडी यांनी सुद्धा पैसे मागितले आहेत त्यांच्यावर पण कारवाईची मागणी निर्मल शर्मा यांच्याकडून करण्यात आली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version