गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव

गोव्यात उत्पल पर्रीकर यांचा पराभव

पणजी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. भाजपचे उमेदवार बाबूश मोन्सेरात यांनी उत्पल पर्रिकर यांचा पराभव केला आहे. भाजपकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे उत्पल पर्रिकर यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. मात्र, पणजी मतदारसंघामध्ये उत्पल पर्रिकर यांचा पराभव झाला आहे.

१४ फेब्रुवारी रोजी ४० विधानसभेच्या जागांसाठी गोव्यात मतदान पार पडले. तर सर्वात छोट्या म्हणजेच गोव्यात आता राजकीय रणधुमाळी पाहायला मिळत आहे. दरम्यान, गोवा विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून उत्पल पर्रीकर यांचा ८०० मतांनी पराभव झाला आहे. काँग्रेसचे दिगंबर कामत यांचा विजय झाला आहे.    

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version