बाॅलिवूडचे नव वधू-वर बाजीराव-मस्तानी अर्थात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे लग्नानंतर पहिल्यांदाच शुक्रवारी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी मनोभावे बाप्पाचं दर्शन घेतलं.
रणवीरने नेहरू जैकेटशी जुळवून कुर्ता पायजमा असे कपडे घातले होते तर दीपिकाने रणवीरच्या पोशाखाप्रमाणेच रंगीत दुपट्टासह लांब कुर्ता परिधान केला होता.
या नव्या जोडप्याला पाहण्यासाठी फॅन्सने मंदिराबाहेर गर्दी केली होती. कोणालाच न दुखवता दीपवीरने हसत हातात हात घालून सर्वांना फोटोसाठी पोज दिली.
दीपिकाचे पालक प्रकाश आणि उज्जला पादुकोण आणि तिची बहीण अनिश पादुकोण हेदेखील मंदिरात आले. रणवीरचे पालक जुगजीत आणि अंजू भावनी त्याच्या बहिणी रितिकाही आले होते.
मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेर दीपिका आणि रणवीर यांचे फोटो पाहा.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.