‘सुनावणी होईपर्यंत जबाब नोंदवू नयेत’

‘सुनावणी होईपर्यंत जबाब नोंदवू नयेत’

मणिपूरमधील दोन महिलांची धिंड काढल्याच्या संतापजनक घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणाचा खटला राज्याबाहेर चालवा यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करणार आहे. मणिपूर प्रकरणाची सुनावणी सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे. कालपासून सुरू असलेल्या या सुनावणीमध्ये काही महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सुनावणी होईपर्यंत सामूहिक बलात्कार करून त्यांची विवस्त्र धिंड काढलेला महिलांचे जबाब नोंदवू नयेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला दिले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महिलांतर्फे वकील निजाम पाशा यांच्या अर्जाची दखल घेतली. महिलांना आज सीबीआयसमोर त्यांचे म्हणणे नोंदवण्यासाठी बोलावण्यात आले आहे. मात्र, केंद्र आणि मणिपूर सरकारची बाजू मांडणारे अधिवक्ता एसजी तुषार मेहता यांनी आपल्याला याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version