बेलेश्वर विहिर दुर्घटनेत मृतांचा आकडा ३५ वर

बेलेश्वर विहिर दुर्घटनेत मृतांचा आकडा ३५ वर

रामनवमीला मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भगवान शंकराच्या मंदिरातील विहिरीवरील छत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ३५ वर पोहोचला आहे. बेलेश्वर महादेव झूलेलाल मंदिरातील विहिरीवर असलेले छत कोसळून अनेक भक्त आत पडले होते. शुक्रवारी पहाटेपर्यंत ३५ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले, तर १८ भाविकांची सुटका करण्यात आली आहे. अजूनही काही जण बेपत्ता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आतापर्यंत १८ जणांना वाचवण्यात यश आले आहे. यापैकी दोघे जण रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी गेले आहेत. त्याच वेळी, १६ जणांवर सध्या अॅपल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर ३५ जणांचे मृतदेह एमवाय हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहेत.

लष्कराचे ७५ जवान बचावकार्य करत आहेत. विहिरीत ४० फूट खोलपर्यंत बचावकार्य करत आहेत. विहिरीतील पाणी गळतीमुळे मध्येच कारवाई थांबवून पाणी उपसावे लागत आहे. लष्कर, एसडीईआरएफ, एनडीईआरएफ, जिल्हा प्रशासन आणि महानगरपालिका यांच्या पथकासह एकूण १४० जण बचाव कार्यात सहभागी आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version