बुलडाणा जिल्ह्यात शिवजयंतीनिमित्त चिखली शहरातून महिलांची मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी चिखली भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह महिला कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साथरोग नियंत्रण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भाजप आमदार श्वेता महाले यांच्यासह ३५ महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनापरवाना मोटारसायकल रॅली काढून बुलढाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आणि राज्य शासनाचे कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप श्वेता महाले यांच्यासह संबंधित महिलांवर केला आहे. या सर्वांवर कलम १८८, २६९, २७० आयपीसी यासह कलम ३ साथरोग प्रतिबंधक अधिनियम, १३५ अंतर्गत ही कारवाई चिखली पोलिसांनी केली आहे.
श्वेता महाले आणि संबंधित महिलांवर करण्यात आलेल्या पोलीस कारवाईचा शहरात निषेध व्यक्त करण्यात येत असून महिला आक्रमक झाल्या आहेत. तसेच महिलांनी कारवाईच्या विरोधात चिखली शहरातील मुख्य शिवाजी चौकात पोलिसांविरोधात ठिय्या आंदोलन केले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.