वृत्तसंस्था, मुंबई
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. हार्दिक बॉलिवूड अॅक्ट्रेस एली एवरामसोबत पाहायला मिळतोय. वृत्तांनुसार हार्दिक एवरामला डेट करत असून सर्वत्र या दोघांच्या अफेयर्सची चर्चा सुरु आहे. या दोघांना खूप ठिकाणी एकत्र पाहण्यात आल्याने या चर्चांना उधाण आले आहे.
दोघेही मात्र, नेहमी एकमेकांना चांगले मित्र सांगत आले आहे. यावेळी तर एवराम आणि पांड्या ऐअरपोर्टवर एकत्र पाहायला मिळालेत. एवराम कारमध्ये बसली होती. पण, कॅमेरा पाहताच तिने आपले तोंड लपवले. डिसेंबर महिन्यात हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्याचे पंखुडी शर्मासोबत लग्न झाले. त्यावेळी लग्नसमारंभाच्या प्रत्येक समारोपात एवराम पाहायला मिळाली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.