कोरोना नियमांबाबत केंद्र सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. देशात लवकरच कोरोना नियममुक्ती मिळणार असून निवडक कोरोना प्रतिबंध ३१ मार्चपासून हटविण्यात येणार आहेत. मात्र, मास्क वापर आणि सामाजिक अंतराची अट पाळणे अनिवार्य असणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका कमी झाल्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ३१ मार्चपासून कोरोना प्रतिबंध हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, ३१ मार्चपासून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लादण्यात आलेले निर्बंध ३१ मार्चपासून रद्द करण्यात येणार आहेत. मात्र, मास्क वापरणे आणि सामाजिक अंतराची अट पाळणे बंधनकारक आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांच्या म्हणण्यानुसार, लागू नियमांची मुदत ३१ मार्च रोजी संपत आहे आणि त्यानंतर गृह मंत्रालयाकडून या संदर्भात कोणतेही आदेश जारी केले जाणार नाहीत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.