समुद्रकिनारी कासवांच्या प्रजातीचे संरक्षण

समुद्रकिनारी कासवांच्या प्रजातीचे संरक्षण

कांदलवन विभाग, वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने गुहागरच्या समुद्रकिनारी स्थानिक लोकांच्या मदतीने यावर्षी दोन मादी कासवांच्या पाठीवर ट्रान्समीटर लावून त्यांना समुद्र सोडण्यात आलेले आहे, कासवाची मादी समुद्रकिनारी येऊन आपले घरटे बनविते आणि त्यात अंडी घालते, अंडी घातल्यानंतर तिचा पुढचा प्रवास कसा असतो ,कोणत्या दिशेने जाते, याचा अभ्यास करण्यासाठी कासव मादीच्या पाठीवर लावलेल्या ट्रान्समीटरच्या मार्फत डाटा गोळा केला जातो आणि त्यावर अभ्यास केला जातो.

गेल्या वर्षी मँग्रो फाउंडेशन, वनविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण पाच कासवे सोडण्यात आली होती. मात्र, त्यांच्यावरील ट्रान्समीटर चार ते पाच महिन्यांमध्येच निकामी झाल्यामुळे यावर्षी पुन्हा हा प्रयोग केला जात आहे. मागील काही वर्षे महाराष्ट्रातील समुद्र किनाऱ्यावरील कासवांच्या प्रजातीचे जतन करण्याचे काम चालू आहे, मात्र यंदा गुहागरमध्ये त्याचे परिणाम दिसून येत आहेत. सुमारे १२९ घरटी गुहागर समुद्रकिनारी स्थानिक वॉलेंटियर्स यांच्या मदतीने हॅचरीजमध्ये ठेवण्यात आलेले आहेत.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version