कृष्णा नदीच्या पात्रामध्ये रंगल्या होडयांच्या शर्यती

कृष्णा नदीच्या पात्रामध्ये रंगल्या होडयांच्या शर्यती

सांगलीच्या मिरजेतील कृष्णा नदीत भव्य होडयांच्या शर्यती पार पडल्या आहेत. मिरजेच्या कृष्णा घाट या ठिकाणी भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश सचिव सागर व्हनखंडे यांच्या वाढदिवसानिमित्ताने भव्य होड्यांच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आला होते. कृष्णा नदी मध्ये पार पडलेल्या या थरारक होडी शर्यतीमध्ये मिरज तालुक्यातल्या कवठेपिरान येथील सप्तर्षी बोट क्लबने प्रथम क्रमांक पटकावला आहे.सर्वच स्पर्धकांनी या स्पर्धेचा मनसोक्त आनंद लुटला.

या स्पर्धेमध्ये सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या 11 होडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पावसाळा सुरू झाला की सांगलीच्या कृष्णा नदी पात्रामध्ये होड्यांच्या शर्यतींचा थरार रंगत असतो आणि यंदाही पावसाळ्यात कृष्णा नदी दुथडी भरून वाहत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version