नागपूरमधील पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपर्यंत स्थगित

नागपूरमधील पहिली ते सातवीचे वर्ग १५ डिसेंबरपर्यंत स्थगित

नागपूर महापालिका हद्दीतील इयत्ता पहिले ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास येत्या १५ डिसेंबरपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. १५ डिसेंबरनंतर कोरोना परिस्थिती आढावा घेऊन शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे नागपूर महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्यातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. मात्र ओमायक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. मात्र पुन्हा ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर महापालिका हद्दीतील शाळा १५ डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत. १५ डिसेंबर नंतर कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आदेश नागपूर मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिले आहेत.

नाशिकमध्ये १३ डिसेंबरपासून शाळा सुरू

दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळलेल्या कोरोना विषाणूच्या नवा व्हेरिएंटमुळे जगभरात चिंता वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये महापालिका हद्दीतील शाळा सुरू करण्याचा निर्णय १० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला होता. ओमायक्रॉनचा परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शिक्षण प्रशासनाने सांगितले होते. आणि आता ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने नाशिकमधील शाळा १३ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय नाशिक मनपा शिक्षण विभागाने घेतला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version