जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद
औरंगाबादमधील मोतीकारंजा परिसरात नळ तोडण्याच्या वादावरुन 2 समाजातील भांडणातून मध्यरात्रीनंतर दंगल झाली असून जाळपोळ आणि दगडफेकीही करण्यात आली आहे. या दंगलीत किमान ३० जण जखमी झाले आहेत. घटनेबाबतची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी उपस्थित झाला असून, परिस्थिती आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दंगलखोरांनी शहरातील दुकानं पेटवून दिली आहेत. तुफान दगडफेकही करण्यात आली आहे. यामध्ये पोलिसांच्या 3 गाड्याही जाळण्यात आल्या आहेत. या दंगलीमुळे सध्या औरंगाबादमध्ये शांततेचं वातावरण पसरलं आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.