‘फूट पक्षात नाही विपक्षात आहे’

‘फूट पक्षात नाही विपक्षात आहे’

महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या सत्तांतरानंतर टोलेबाजी सुरु झाली आहे. त्यातच यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणतीही फूट नाही राष्ट्रवादी विपक्षामध्येच आहे’ असं वक्तव्य दादा गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

ताई काय म्हणाल्या माहित नाही परंतु सध्या राष्ट्रवादीचे नेतृत्व अजित पवार हे करीत असून पक्षाचे आमदार, मंत्री हे महाराष्ट्राच्या विकासाकरिता काम करत आहेत. आणि महाराष्ट्राचा विकास करीत आहेत. आम्ही फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार घेऊन महाराष्ट्राची प्रगती कशी व्हावी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे सबका साथ सबका विकास याप्रमाणे महाराष्ट्राचे सर्वांगीण विकास करायचा असल्यामुळे आम्ही सरकारसोबत आहोत आणि राष्ट्रवादी ही सरकारसोबत काम करत आहे. महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मराठवाडा, कोकण, विदर्भ या हा भाग मागासलेला आहे असं नेहमीच म्हंटल जातं त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक जर औरंगाबाद येथे होत असेल तर मराठवाड्याचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी सोडवल्या जाऊ शकतात. अशीच मंत्रिमंडळाची बैठक येणाऱ्या दिवसात नागपूर आणि अमरावती मध्ये व्हावी जेणेकरून विदर्भातील प्रश्न सोडवता येतील. अनेक उद्योग, सिंचन यांचे प्रश्न सोडविता येतील आणि विकास साधण्यासाठी समतोल विकास साधण्यासाठी अशा प्रकारचे मंत्रिमंडळाच्या बैठक आयोजित करणे हे महत्त्वाचे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कोणतेही आजी, माजी सदस्य जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यांचे जिल्ह्यामध्ये स्वागतच आहे. तसेच रोहित पवारसुद्धा येणाऱ्या दिवसात गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्याबाबत त्यांनी मला विचारणासुद्धा केली आहे. त्यांचेसुद्धा मी जिल्ह्यामध्ये स्वागत करतो. पवार कुटुंबातील कोणताही सदस्य गोंदिया जिल्ह्यात आला तर माझ्या घरचे दरवाजे त्यांच्यासाठी नेहमीच उघडे आहेत. आणि हे माझं घर नसून पवार कुटुंबाचेच घर आहे. त्यांचं मी स्वागत करतो. भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे तिन्ही मिळून विधानसभा आणि लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे कोण कोणती लोकसभा लढेल हे सध्या निश्चित झालेले नाही आणि ज्या पक्षाची ताकद या भागात जास्त आहे त्या पक्षाला ती जागा लढवण्यासाठी प्रयत्नशील राहणार.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version