‘समृद्धी महामार्गा’वर पूजेमुळे अपघात होणार नसल्याचा दावा

‘समृद्धी महामार्गा’वर पूजेमुळे अपघात होणार नसल्याचा दावा

समृद्धी महामार्गावर सुरुवातीपासूनच अपघातांचं सत्र सुरूच आहे. 1 जुलै रोजी एका खाजगी बसचा अपघात झाला होता, त्यात २५ प्रवाश्यांचा होरपळून मृत्यू झाला होता. यामुळे अपघात स्थळाजवळील गावातील नागरिक भयभीत झालेले आहे. त्यांची भीती घालवण्याच्या उद्देशाने स्वामी समर्थ मंडळाकडून श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

स्वामी समर्थ मंडळाकडून शेकडो भक्तांकडून अपघात स्थळी श्रद्धांजली वाहण्यात आली. मात्र त्याचे व्हिडिओ व्हायरल करून पूजा केल्याने अपघात होणार नसल्याचा दावा करणाऱ्या निलेश आढाव या तरुणाविरुद्ध सिंदखेड राजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा विरोधी कायद्याच्या कलम 2 आणि 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मात्र निलेश आढाव यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, समृद्धी महामार्गाच्या बाजूला असलेल्या गावात नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांची भीती दूर व्हावी या हेतूने हा श्रद्धांजली व पूजाचा कार्यक्रम घेण्यात आला होता , परंतु जर अनावधानाने माझ्या बोलण्याने काही अंधश्रद्धा पसरली असेल तर मी माझे शब्द परत घेतो असे ते म्हणाले.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version