विकृत नराधमाकडून तरुणीसोबत अश्लिल चाळे; चर्चगेट रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

विकृत नराधमाकडून तरुणीसोबत अश्लिल चाळे; चर्चगेट रेल्वे स्थानकातील धक्कादायक घटना

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

खैरलांजी ते कोपर्डी. समाजातली वखवखलेली नजर सर्वच ठिकाणी. अगदी मुंबईतली गजबजलेली स्टेशन्सही याला अपवाद ठरलेली नाहीत.

 

सीएसटी स्टेशनवर भर रेल्वेत तरुणीला पाहून हस्तमैथून करणाऱ्या निर्लज्ज तरुणाची घटना ताजी आहे. पण चर्चगेट स्टेशनवर असाच एका डोक्यात तिडीक जाणारा

प्रकार समोर आला आहे.

 

चर्चगेट स्टेशनवर  ट्रेनची वाट पाहत असणाऱ्या मुलीसोबत विकृत नराधमानं अश्लिल चाळे केलेत. या विकृतानं वाट पाहणाऱ्या तरुणीला नकोसा स्पर्श केला.

 

या मुलीनं सेकंदाच्या आत या नराधमाचा पाठलाग केला. आरडाओरडा केला. तेव्हा हा विकृत पळायला लागला. पण, बहाद्दर मुलीनं त्याचा पाठलाग सुरु ठेवला.

 

अखेर महिला पोलिसांनी या विकृताच्या मुसक्या आवळल्या. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पण हा विकृतही अल्पवयीन मुलगा असल्याने त्याची रवानगी

बालसुधारगृहात करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version