सोलापुरच्या विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडण्याबाबत कार्यवाही गुरुवारपासून (दि.१५ जून) सुरु करण्यात येणार आहे. या संदर्भात सोलापूर महापालिका प्रशासनाने सिद्धेश्वर कारखान्याच्या प्रशासकांना नोटीस बजावली आहे. २७ एप्रिल रोजी कारखान्याची चिमणी स्वतःहून पाडून घेण्यासाठी ४५ दिवसांची मुदत दिली होती. परंतु ही मुदत ११ जून रोजी समाप्त झाली आहे. पण कारखान्याने स्वतःहून चिमणी काढली नाही. त्यामुळे आता महापालिका यासंदर्भात कार्यवाही सुरु करणार आहे. ही कार्यवाही गुरुवारपासून (दि.१५ जून) सुरू करत असल्याची नोटीस महापालिकेने दिली आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.