चवदार तळे सत्याग्रह दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. खेड येथील सभेनंतर परतीच्या प्रवासादरम्यान त्यांनी रात्री उशीरा चवदार तळ्याला भेट दिली. चवदार तळे येथील बाबासाहेबांच्या प्रतिमेला त्यांनी पुष्पहार अर्पण करीत ते बुद्धवंदनेत सहभागी झाले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असून त्याच्या सुशोभिकरणासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
यावेळी रायगडचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नरनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टी चे महासंचालक श्री. धम्माज्योती गजभिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.नामदे, महाड तहसिलदार सुरेश काशीद, महाड मुख्याधिकारी महादेव रोडगे, पोलादपूर तहसिलदार श्रीमती दीप्ती देसाई आदि मान्यवर उपस्थित होते.
प्रसार माध्यमांशी बोलताना महापुरषाच्या काळातील आठवणींना उजाळा देत सुवर्ण मंदीराच्या धरतीवर चवदार तळ्याचे पाणी देखील शुद्ध करण्यासाठी यंत्रणा राबवण्याच्या सुचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. चवदार तळे हा ऐतिहासिक ठेवा असुन त्याच्या सुशोभिकरण, सौंदर्यीकरणाला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.