मुख्यमंत्री शिंदे यांचा अशोक चव्हाण यांना सवाल

मुख्यमंत्री शिंदे यांचा अशोक चव्हाण यांना सवाल

मुंबई, ३ सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : बुलढाणा येथे ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच धारेवर धरलं. “जालन्यातील घटना दुर्दैवी आहे. ही घटना कशामुळे झाली, हे शोधण्यासाठी काही लोक येऊन गेले. ज्या लोकांनी आरक्षणाचा गळा घोटला तेच याठिकाणी गळा काढायला आले होते,” असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर घणाघात केला. “अशोक चव्हाणजी, तुम्ही तर मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष होता, तुम्ही मराठा आरक्षणासाठी काय केले ? आरक्षणासाठी तुम्ही काहीही केले नाही, याचा मी साक्षीदार आहे,” असा आरोप मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे.

पुढे शिंदे म्हणाले की, “मी मुख्यमंत्री झाल्यापासून, मुख्यमंत्री बदलणार, अशी ओरड काही जण करीत आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोन्याच्या चमचा घेऊन मी जन्माला आलो नाही, मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे. माझे मुख्यमंत्रीपद जाईल, असे सांगणारे ज्योतिषींही आता थकले आहेत,”

“अजित पवारही आता आमच्या सरकारमध्ये आले असून आमचं सरकार मजबूत सरकार आहे. आमच्यात नाराजी नाही. आमचा फेव्हिकॉलचा मजबूत जोड आहे. अजित पवार नाराज नाहीत,” असे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नियोजित दौरा असल्याने ते या कार्यक्रमाला आले नाही, असे सांगण्यात आले. यावेळी मंत्री गिरीश महाजन, संजय राठोड, संजय गायकवाड, संजय रायामुलकर , खासदार प्रतापराव जाधव उपस्थित होते

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version