राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. पेट्रोल ५ रुपयांनी स्वस्त, डिझेल ३ रुपयांनी स्वस्त अशी मोठी घोषणा शिंदे सरकार कडून करण्यात आली आहे. आज राज्य मंत्रीमंडळाची आज बैठक पार पडली, या बैठकींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे, याच घोषणे सोबतच त्यांनी शेतकऱ्यांना देखील दिलासा दिला आहे . नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५०,००० अनुदान देणार असे देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, पेट्रोलवर प्रतिलिटर ५ रुपयांची कर कपात तर डिझेलवर प्रतिलिटर ३ रुपयांची कर कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणाले कि , ४ नोव्हेंबर २०२१ आणि २२ मे २०२२ रोजी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केंद्र सरकारने कपात केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यावेळी राज्य सरकारांनाही तसे आवाहन केले होते की राज्यांनी आपल्या आपल्या इथे इंधनावरील कर कपात करावी. मात्र, काही राज्यांनी कर कपात केली नाही. पण आता युतीचं सरकार स्थापन झाल्यावर ठरवले की, जनतेच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. त्यामुळेच आम्ही पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर प्रति लिटर ३ रुपयांनी कर कपात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. या निर्णयामुळे राज्य शासनाच्या तिजोरीवर जवळपास ६ हजार कोटींचा भार पडेल.
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय ▪ पेट्रोलवर ५ रुपये आणि डिझेलवर ३ रुपये प्रति लिटर दर कमी करण्याचा निर्णय ▪राज्यात "स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अभियान" राबविणार. ▪ केंद्र पुरस्कृत अमृत अभियान २.० (Atal Mission For Rejuvenation & Urban Transformation) राज्यात राबविणार pic.twitter.com/2AMI4gpNVJ — MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 14, 2022
Great relief to Maharashtrian & Marathi Manus !
Happy to announce that new Government under CM Eknathrao Shinde has decided to reduce Petrol & Diesel prices by ₹5/litre & ₹3/litre respectively.#CabinetDecision #PetrolDieselPrice #Maharashtra — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 14, 2022
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.