वृत्तसंस्था, गुजरात
गुजरात विधानसभेत अभूतपूर्व राडा पाहायला मिळालाय. काँग्रेस आमदारेनं सत्ताधारी भाजप आमदाराला मारहाण केलीय. काँग्रेसचे आमदार प्रताप दुधात यांनी भाजप आमदार जगदीश पांचाळ यांना मारहाण केलीय.
भाजप आमदाराच्या अंगावर धावत जाऊन टेबलवरील माईकने त्यांना मारहाण केलीय. प्रताप दुधात हे काँग्रेसचे निकोल मतदारसंघाचे आमदार आहेत.
दुसरीकडे काँग्रेसचे आमदार विक्रम माडम यांनी माईक तोडला, तर राजुलाचे आमदार अंबरीश डेर यांनीही भाजप आमदाराला मारहाण केली.
या राड्यानंतर काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.