Central Railway Megablock : रविवारी वेळापत्रक बघूनच प्रवास करा; रेल्वेच्या मुख्य मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

Central Railway Megablock : रविवारी वेळापत्रक बघूनच प्रवास करा; रेल्वेच्या मुख्य मार्गासह ट्रान्स हार्बर मार्गावरही मेगाब्लॉक

मुंबई : सध्या मुलांच्या शाळा आणि काॅलेजला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या असून मुंबईकर फिरण्याच्या निमित्ताने, नातलगांकडे जाण्याकरता, गावी जाण्यासाठी अथवा राज्याबाहेर सुट्टीची मज्जा घेण्यासाठी प्लॅन करतात. अशावेळी प्रवासासाठी लोकल हा उत्तम पर्याय ठरतो. मात्र नेहमीप्रमाणे यंदाी रविवार, 10 मे 2026 रोजी मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांना लोकल उशीरा धावण्याचा किंवा रद्द होण्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. परिणामी, फिरण्यासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी फलाटावर दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी मेगाब्लॉकचे वेळापत्रक बघूनच घराबाहेर पडावे असे आवाहन मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून करण्यात आले आहे. मध्य रेल्वे, मुंबई विभागात 10 मे 2026 रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी आपल्या मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड दरम्यान आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.

या मार्गावर असेल ब्लाॅक –

मुख्य रेल्वे मार्ग –

ब्लॉक : माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान, अप आणि डाउन जलद मार्गांवर सकाळी 11.05 ते दुपारी 3,45 पर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 पर्यंत सुटणाऱ्या डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आपल्या नियोजित थांब्यांनुसार थांबतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्यापलीकडील जलद गाड्या मुलुंड स्थानकावर डाउन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

ठाणे येथून सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 पर्यंत सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान त्यांच्या  वेळापत्रकानुसार थांबतील, माटुंगा स्थानकावर पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचतील.

हेही वाचा : Happy Mothers Day 2026 : मायलेकराचं नातं सर्वात गोड! दीपिका पादुकोणपासून कॅटरीना कैफपर्यंत सर्वांनी सिद्ध केलंय चाळिशीनंतरही मातृत्व शक्य

ट्रान्स-हार्बर लाईन – 

अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 पर्यंत ब्लॉक असेल.

ब्लॉक कालावधीत वाशी/नेरुळ आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप आणि डाउन ट्रान्स-हार्बर लाईनवरील सेवा रद्द राहतील.

ठाणे येथून सकाळी 10.35 ते सायंकाळी 16.07 पर्यंत वाशी / नेरुळ / पनवेल येथे जाणाऱ्या डाउन लाईन सेवा आणि 
पनवेल / नेरुळ / वाशी येथून सकाळी 10.25 ते सायंकाळी 16.09 पर्यंत ठाण्याकडे जाणाऱ्या अप लाईन सेवा रद्द राहतील.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version