Mumbai AC Local : मुलुंडमध्ये एसी ट्रेनचा एसी बंद, प्रवाशांचा जीव गुदमरला; महिला प्रवासी बेशुद्ध

टिटवाळा-सीएसएमटी एसी लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने एसी बंद पडला. दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्या.
Mumbai AC Local : मुलुंडमध्ये एसी ट्रेनचा एसी बंद, प्रवाशांचा जीव गुदमरला; महिला प्रवासी बेशुद्ध

मध्य रेल्वेच्या एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. टिटवाळा येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)कडे निघालेल्या एसी लोकलमधील एका एसी युनिटमध्ये बिघाड झाल्याने डब्यातील वातानुकूलित व्यवस्था बंद पडली. दरवाजे आणि खिडक्या बंद असल्यामुळे अनेक प्रवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला, तर काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही एसी लोकल नियमित सेवेनुसार टिटवाळा येथून सीएसएमटीकडे जात होती. मात्र, प्रवासादरम्यान एका एसी युनिटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने डब्यातील हवा खेळती राहिली नाही. परिणामी, उकाडा वाढल्याने अनेक प्रवाशांना गुदमरल्यासारखे वाटू लागले.

हेही वाचा:Hapur Acid Incident: दागिन्यांच्या दुकानात भीषण दुर्घटना; पाण्याची बाटली समजून तरुणीने प्यायलं ॲसिड, एका घोटात…

मुलुंड रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर लोकल थांबलेली असताना जवळपास १५ मिनिटे एसी बंद असल्याचा प्रवाशांचा दावा आहे. या काळात काही प्रवाशांना श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. विशेषतः काही महिला प्रवासी बेशुद्ध पडल्याने स्थानकावरील इतर प्रवाशांनी त्यांना तातडीने मदत केली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने संबंधित लोकल कुर्ला स्थानकात सेवेतून बाजूला काढली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून पुढील प्रवासासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली. बिघाड झालेली एसी लोकल दुरुस्तीसाठी कार्यशाळेत पाठवण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा: Palghar Flood Update : काळीज पिळवटणारी घटना! चारही बाजूंनी पाणी, मृतदेहासह कुटुंबाला छतावर काढावी लागली रात्र

या घटनेचा परिणाम पुढील दोन फेऱ्यांवरही झाला असून संबंधित एसी लोकलच्या दोन सेवा तात्पुरत्या नॉन-एसी लोकल म्हणून चालवण्यात येणार आहेत. तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून तपास सुरू आहे.

दरम्यान, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी एसी लोकलची नियमित तांत्रिक तपासणी आणि देखभाल अधिक प्रभावीपणे करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version