आषाढी एकादशीच्या निमित्ताने सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यसह देशाच्या विविध भागातून संतांच्या पालख्या वाखरीत दखल झाल्या आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यात आज सकाळी एक मोठी दुर्घटना टळली. माउलींच्या पालखीतील वारकरी न्याहारीचा स्वयंपाक ट्रकमध्ये करत असताना गॅस सिलिंडरमधून गॅस गळती होऊन अचानक वाहनाला आग लागली. विशेष म्हणजे, ही घटना घडली त्यावेळी अवघ्या 100 मीटर अंतरावर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उपस्थित होती.
लाखो भाविक दर्शन घेण्यात मग्न असताना ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. या घटने दरम्यान स्वयंपाकाचे सर्व साहित्य जळून खाक झाले असून सुदैवाने मोठा अनर्थ टाळला. या घटनेत गाडीतील 65 वर्षाचे वारकरी गाडीतून बाहेर निघत असताना भाजले असून भाजलेल्या वारकऱ्याल्या दोन्ही हाताला जखम झाली आहे. यावेळी शेजारी दोन गाड्यांमध्ये जवळपास 10 भरलेले गॅस सिलेंडर होते. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन पथक घटनास्थळी दाखल झाले, आणि अग्निशमन पथकाच्या कर्मचाऱ्यांमुळे आग आटोक्यात येण्यास मदत झाली. सुदैवाने, वेळेवर आग आटोक्यात आणल्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तर दुसरीकडे आषाढी वारीनिमित्त सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी गेल्या 20 ते 25 दिवसांपासू पायी निघालेले संतशिरोमणी ज्ञानेश्वर महाराज, संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले विविध संतांचे पालखी सोहळे गुरुवारी वाखरी मुक्कामी, पंढरपूरच्य वेशीवर विसावले असून शुक्रवारी हे पालखी सोहळे पंढरपुरात प्रवेश करणार आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.