Tiger Shakti: राणीबागेत वाघ ‘शक्ती’ मृत; माहिती आठ दिवस लपवली?

मृत्यूची माहिती आठ दिवस लपवल्याचा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला असून उद्यान व्यवस्थापनावर चौकशीची मागणी होत आहे.
Tiger Shakti: राणीबागेत वाघ ‘शक्ती’ मृत; माहिती आठ दिवस लपवली?

मुंबईतील भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालयात नेहमीप्रमाणे मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलचेल असते. विशेषतः मुलांना हे उद्यान आणि त्यातील प्राणी पाहण्याचा अनुभव खूप आवडतो. मात्र, येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राणीबागेत असणाऱ्या वाघ ‘शक्ती’चा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. 2020 मध्ये आला होता ‘शक्ती’ शक्ती या नर वाघाला 2020 मध्ये छत्रपती संभाजीनगरच्या प्राणीसंग्रहालयातून भायखळा राणीबागेत आणण्यात आले होते. मृत्यूच्या वेळी वाघाचे वय 10 वर्षे होते. उद्यान प्रशासनाने तयार केलेल्या नैसर्गिक सदृश अधिवासात तो ठेवण्यात आला होता.

17 नोव्हेंबर रोजी श्वसनाचा त्रास

त्यानंतर उद्यान प्रशासनाच्या प्राथमिक माहितीनुसार, शक्तीला 17 नोव्हेंबर रोजी अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला. त्यानंतर काही क्षणातच त्याचा मृत्यू झाला. प्राथमिक तर्कानुसार शक्तीचा मृत्यू एपीलेप्सी (अपस्मार) झटक्यांमुळे झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Honkong Fire Tragedy: हॉंगकॉंगमध्ये भीषण आग; मृतांची संख्या 44 वर, शेकडो जण बेपत्ता

आठ दिवस मृत्यूची माहिती लपवल्याचा गंभीर आरोप

या प्रकरणाने अधिक वाद निर्माण केला आहे कारण शक्तीच्या मृत्यूची माहिती तब्बल आठ दिवस जाहीर करण्यात आली नाही. योग्य काळजी न घेतल्यामुळेच वाघाचा मृत्यू झाला आणि त्यानंतरही घटना लपवून ठेवण्यात आली, असा आरोप पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

पर्यावरणप्रेमी आणि प्राणीसंवर्धन कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत म्हटले आहे की, अशी गंभीर माहिती तात्काळ जाहीर व्हायला हवी होती. “हा मृत्यू लपवून ठेवण्यात आला, ही गोष्ट अत्यंत चिंताजनक आहे आणि उद्यान व्यवस्थापनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उभे करते,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. या घटनेची सखोल चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

हेही वाचा: Badlapur-Karjat Railway Project: बदलापूर-कर्जत लोकल सेवेत होणार मोठा बदल; प्रवास होणार सुसाट, मुंबईसह पुणेकरांनाही फायदा

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version