DSK यांच्या मदतीला धावून आली बुलडाणा अर्बन बँक; देणार 100 कोटींचं कर्ज

DSK यांच्या मदतीला धावून आली बुलडाणा अर्बन बँक; देणार 100 कोटींचं कर्ज

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आर्थिक अडचणीत सापडलेल्या डीएसकेंच्या मदतीला आता बुलडाणा अर्बन बँक धावून आलीय. बुलडाणा अर्बन बँक 100 कोटीचं कर्ज देण्यास इच्छुक असून 12 कोटींची संपत्तीही विकत घेण्यास उत्सुक असल्याचं बँकेच्या वतीनं न्यायालयात सांगण्यात आलंय.

दरम्यान 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालयात अंतिम फैसला होणाराय. यावेळी डीएसकेंच्या चौकशीसाठी ताब्यात घेण्याची मागणी करणाऱ्या राज्य सरकारला न्यायालयानं फटकरालंय.

इतके दिवस जी मागणी केली नाहीत ती आता शेवटी का करताय? असा सवालही न्यायालयानं विचारलाय. तसंच सरकारनं ही संपत्ती ताब्यात घेऊन, गरजू पीडितांना आधी त्यांची रक्क देण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत.

याप्रकरणी 22 फेब्रुवारीला मुंबई उच्च न्यायालय निकाल देणार आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version