मुख्याध्यापकाला भर वर्गात मारहाण, घटना cctv मध्ये कैद…

मुख्याध्यापकाला भर वर्गात मारहाण, घटना cctv मध्ये कैद…

जय महाराष्ट्र न्यूज, बुलडाणा

बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा शहराच्या तक्षशिला विद्यालयात वर्ग सुरू असताना विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
 
शाळेतील दोन विद्यार्थ्यांमधील वाद सोडवण्याचा राग मनात धरत विद्यार्थ्याच्या पालकांनी भर वर्गात मुख्यध्यापकाला मारहाण केली आहे. या घटनेमुळे वर्गात बसलेल्या विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ह्या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली असून 5 लोकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version