BudgetLive : सर्वसामान्यांना दिलासा, ‘अशी’ असेल नवी करप्रणाली

BudgetLive : सर्वसामान्यांना  दिलासा,  ‘अशी’ असेल नवी करप्रणाली

निर्मला सीतारमन लोकसभेत 2020 या वर्षांचं केंद्रीय अर्थसंकल्प मांडत आहेत. यादरम्यान अर्थमंत्र्यांनी वार्षिक उत्पन्नावरील करप्रणाली जाहीर केली आहे.

यामध्ये अर्थमंत्र्यांनी करदात्यांना दिलासा दिला आहे.

संबंधित बातमी- Budget2020 Live: ‘अर्थ’2020 चा

यामध्ये 5 लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही, यापुढेही तो द्यावा लागणार नाही.

5 लाख ते 7.50 लाखांदरम्यान वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या करदात्यांना आता आपल्या उत्पन्नावर 20 ऐवजी 10 टक्के उत्पन्न कर द्यावा लागणार आहे.

7.50 लाख ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना उत्पन्न करात 5 टक्क्यांनी सवलत मिळाली आहे. या अशा करदात्यांना आता 15 % इन्कम टॅक्स द्यावा लागणार आहे.

आधी या वर्गातील करदात्यांना 20% उत्पन्न कर द्यावा लागत होता.

10 लाख ते 12.50 लाख उत्पन्न असणाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. या वर्गातील करदात्यांना 10 टक्क्यांनी सवलत मिळाली आहे.

या वर्गातील करदात्यांना आता उत्पन्नावरील एकूण २० टक्के उत्पन्न द्यावा लागणार आहे. आधी हा दर 30% इतका होता.

12.5 लाख ते 15 लाखांच्या दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना 5 टक्क्यांनी आयकर कमी करून अर्थमंत्र्यांनी दिलासा दिला आहे. या वर्गातील करदात्यांना आता 30 टक्क्यांऐवजी 25% उत्पन्न कर भरावा लागणार आहे.
15 लाखांच्या वर उत्पन्न असणाऱ्यांना मात्र 30 टक्के उत्पन्न कर द्यावा लागणार आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version