बुद्ध पौर्णिमेला नवा अध्यक्ष ठरणार

बुद्ध पौर्णिमेला नवा अध्यक्ष ठरणार

शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केल्यानंतर संपूर्ण राष्ट्रवादी पक्ष हादरला आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. या पार्शवभूमीवर राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत ५ मे रोजी निर्णय घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले आहे.

पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवृत्तीबाबतच्या निर्णयानंतर एकीकडे अनेक राजकीय विश्लेषकांनी दिलेल्या प्रतिक्रियांमधून आता या अध्यक्षपदाची धुरा सुप्रिया यांच्याकडे दिसून येत आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी ६ मे रोजी बैठक होणार होती. परंतु हि बैठक ५ मे रोजीच घ्या असं पवारांनी म्हटल आहे. तसेच समिती जो निर्णय घेईल तो मान्य असेल अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देताना मी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आणि माझ्या कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला हवं होतं. जर मी हा निर्णय सर्वांना विचारून घेतला असता तर स्वाभाविकरित्या सर्वांनी मला विरोध केलाच असता. म्हणून मी हा निर्णय माझ्या मनाशी एकमत करून घेतला. अध्यक्षपदासाठी जी समिती नेमली आहे त्यांनी ५ मे रोजी बैठक घ्यावी. या बैठकीमध्ये समिती जो काही निर्णय घेईल तो आपल्याला मान्य असेल.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version