नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमधली झाडं पुन्हा लागली बोलू

नाशिकच्या बोटॅनिकल गार्डनमधली झाडं पुन्हा लागली बोलू

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकमधल्या बोटॅनिकल गार्डनमधला लेझर शो आजपासून सुरू होणार आहे.इथल्या बोलक्या झाडाचं लेझर शो पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत होती.

 

मात्र, वीजेच्या खेळखंडोब्यामुळे हा लेझर शो बंद केल्याने इथे येणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होत होता. याबाबतची माहिती जय महाराष्ट्रनं दाखवली होती.

 

इथला लेझर शो लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली होती. अखेर आजपासून हा लेझर शो सुरू करण्यात येणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असन राज ठाकरे आणि टाटा ट्रस्ट यांच्या प्रयत्नाने या गार्डनची निर्मिती करण्यात आली.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version