Pune University Fake Marksheet Scam : विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळ! शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्रीचा घोटाळा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठातीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune University Fake Marksheet Scam : विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळ! शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्रीचा घोटाळा

शिक्षणाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात बोगस मार्कशीट आणि डिग्री देणारा घोटाळा उघडकीस आला आहे. विद्यापीठातीलच काही कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा रॅकेट चालवत असल्याची माहिती समोर आली आहे. फक्त काही लाख रुपयांसाठी विद्यापीठातील कर्मचारी विद्यार्थ्यांच्या भवितव्यांशी खेळून काही विद्यार्थ्यांना कोणतेही शिक्षण न घेता त्यांना बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करत आहेत. साहिल महेश कदम या विद्यार्थ्याला बीकॉमची मार्कशीट आणि डिग्री मिळवून देण्यासाठी विद्यापीठातील कर्मचारी रमेश मुखेकर याने तीन लाख रुपये मागून त्यातील काही रक्कम स्वीकारल्याची धक्कादायक माहिती दिली आहे. 

हेही वाचा- NEET Paper Leak : NEET च्या पुनर्परीक्षेचा पेपरही फुटला; फिजिक्सच्या पेपरचे प्रश्न परीक्षेआधीच लीक झाल्याची मुंबई CBI कडे तक्रार

विशेष म्हणजे विद्यापीठात कोणताही प्रवेश न घेता तसेच कोणत्याही शिक्षण न घेता रमेश मुखेकर यां विद्यापीठातील कर्मचाऱ्याने साहिल महेश कदम या विद्यार्थ्याला अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेट मिळून दिले आहेत. विद्यापीठात पूर्वी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डाटाची माहिती घेऊन तसेच त्यात खोडसाळ करून रमेश मुखेकर हे विद्यापीठातील कर्मचारी बोगस मार्कशीट आणि डिग्री विक्री करणारा घोटाळा चालवत होते. या रॅकेटमध्ये रमेश मुखेकर हे एकटे नसून त्यांच्यासोबत विद्यापीठातील परीक्षा विभागातील काही अधिकारी आणि कर्मचारी असल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट समजला जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची प्रतिमा मलीन करणाऱ्या दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी लेखी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे योग शहराध्यक्ष डॉ धम्मरत्न गायकवाड यांनी केली आहे. मात्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर सुरेश गोसावी यांनी या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच त्यांनी या संदर्भात माध्यमांशी बोलणं देखील टाळला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version