BMC On Waterlogging : मान्सूनसाठी महापालिका सज्ज! मुंबईत 400 ठिकाणी केल्या उपाययोजना; तर यंदा 100 ठिकाणी पाणी तुंबण्याचा केला दावा

BMC On Waterlogging : मान्सूनसाठी महापालिका सज्ज! मुंबईत 400 ठिकाणी केल्या उपाययोजना; तर यंदा 100 ठिकाणी पाणी तुंबण्याचा केला दावा

मुंबई : काही दिवसातच मान्सून राज्यासह मुंबईत धडकणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. पावसाळा आला की मुंबईत जागोजागी पाणी साचण्याच्या समस्या वाढू लागतात. त्यामुळे याची खबरदारी घेऊन महापालिकेने पावसाळापूर्व कामे वेगाने केल्याची माहितील दिली आहे. तसेच या वर्षी सुमारे 100 ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. मुंबईत एकूण 497 ठिकाणी पाणी तुंबण्याचा धोका होता. यातील 403 ठिकाणी पाण्याच्या निचरयासाठी उपायोजना केल्या असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. पावसाळापूर्व कामांमध्ये पालिकेकडून नालेसफाई, रस्तेदुरुस्ती केली जात असली तरी अतिवृष्टीत मुंबईत पाणी तुंबण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे पालिका पाण्याच्या निचऱ्यासाठी उपाययोजना करीत असते. मात्र दरवर्षी पाणी तुंबणारी नवीन ठिकाणे तयार होत असतात. या वर्षी पाणी तुंबणाऱ्या 130 नव्या ठिकाणांचा समावेश झाला आहे. पाणी तुंबू नये यासाठी सहा उच्च क्षमतेचे पंपिंग स्टेशन आणि दहा मिनिपंपिंग स्टेशन्स 1 मेपासूनच कार्यान्वित करण्यात आली आहेत. तर गतवर्षीप्रमाणे मान्सूनपूर्व पावसाची शक्यता लक्षात घेता 15 मेपासून सर्व पंप सज्ज ठेवण्यात आले आहेत.

हेही वाचा : Weather Update : हवामान खात्याचा कोकणासह, मराठवाडा आणि उत्तर-पश्चिम महाराष्ट्राला दिला 'हा' महत्त्वाचा इशारा; विदर्भात काय स्थिती?

दरम्यान, मुंबई सर्वात जास्त पाणी साचण्याची समस्या उद्भवते, ते मिठी नदीत. याच मिठी नदीच्या सफाईचे काम रखडले असून पावसाळा तोंडावर आला असताना मिठी नदीतून गाळ, कचरा काढण्याचे काम फक्त 56 टक्के झाल्याचे समजते. गाळ काढण्यासाठी 31 मेची डेडलाईन आहे. त्यामुळे मिठी नदीची पूर्ण सफाई होणे कठीण बनले आहे. मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदार येण्यास विलंब झाल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. मात्र अतिवृष्टीत मिठी नदीच्या काढावर वसलेल्या रहिवाशांना धोका निर्माण झाला आहे.

नवीन फ्लडिंग पॉइंट – 2026

शहर 35 
पश्चिम उपनगर 30
पूर्व उपनगर 65
एकूण 130

जुने फ्लडिंग पॉइंट

शहर 139
पश्चिम उपनगर 161
पूर्व उपनगर 131
एकूण – 431

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version