‘कर्नाटकात भाजपचा प्रचार म्हणजे गद्दारी’

‘कर्नाटकात भाजपचा प्रचार म्हणजे गद्दारी’

राजकारणात सातत्याने नव्या घडामोडी सुरूच असतात. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. कर्नाटकात १० मे रोजी मतदान होणार असून त्याबाबतचा कर्नाटकातील भाजपचा सुरु असलेला प्रचार म्हणजे गद्दारी असल्याचं खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.

एकीकडे संजय राऊत बेळगाव दौऱ्यावर जाणार असून ते महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचारात सहभागी होणार आहेत. तर दुसरीकडे १० मे रोजी कर्नाटकात मतदान होणार असून मुख्यमंत्री शिंदे कर्नाटक दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या मतदानाच्या पार्शवभूमीवर कर्नाटकाच्या सीमाभागात भाजपा प्रचार करणार आहे. परंतु, कर्नाटकातील भाजपचा सुरु असलेला प्रचार म्हणजे गद्दारी असल्याचं खळबळजनक वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. तसेच एकीकरण समितीच्या उमेदवारांना पाडणं म्हणजे मराठी लोकांच्या विरोधात जाणं असून सीमाभागातील लढा आणि भाजपाचा संबंध नाही असंही राऊत यांनी म्हंटल आहे. तसेच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवासाठी भाजपाची फौज जात असल्याचं खोचक विधानही राऊतांनी केलं आहे. तर, ‘संजय राऊतांनी काँग्रेसची दलाली थांबवावी’ असे जोरदार प्रत्त्युत्तर फडणवीसांनी राऊत यांना दिले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version