“अन्यथा 8 दिवसांत भाजपमध्ये भूकंप घडवू!”

“अन्यथा 8 दिवसांत भाजपमध्ये भूकंप घडवू!”

‘आठ दिवसात सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि पदाधिकारी बदला अन्यथा आठ दिवसात भूकंप घडवू’ असा इशारा सत्ताधारी भाजपांच्या २० जिल्हा परिषद सदस्यांनी दिला आहे. यामुळे सत्ताधारी भाजपामध्ये बंडाचा झेंडा फडकला आहे. २० सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन हा इशारा दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील भाजपा आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

सांगलीत जिल्हा परिषदेतील भाजपामध्ये गटबाजी उफाळून आली आहे. सत्ताधारी भाजपातील सदस्यांनी विद्यमान अध्यक्ष त्याचबरोबर पदाधिकारी बदलाची जाहीर मागणी केली आहे. सांगलीत भाजपाची सत्ता असून याठिकाणी भाजपाचे संग्रामसिंह देशमुख जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत. तर शिवसेनेचे सुहास बाबर हे उपाध्यक्ष आहेत. दरम्यान अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्या बदलाची मागणी ही सत्ताधारी भाजपाच्याच सदस्यांनी एकत्र येऊन केली आहे. आज या सदस्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ताधारी भाजप नेत्यांना बंडाचा झेंडा दाखवला आहे. आठ दिवसात अध्यक्ष व पदाधिकारी बदला अन्यथा जिल्हा परिषदेत भूकंप घडवू असा थेट इशारा दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य शिवाजी डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्या सदस्यांनी हा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदमधील भाजपातील गटबाजी व संघर्ष उफाळून आला आहे. पक्षश्रेष्ठींच्या कडून याबाबत दखल न घेतल्यास या सदस्यांनी राजीनामा अस्त्र उगारण्याचा इशारा दिला आहे. भाजप सदस्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र खळबळ उडाली आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version