बाबाने घातला नवी मुंबईतील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलाला कोट्यावधींचा गंडा

बाबाने घातला नवी मुंबईतील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या मुलाला कोट्यावधींचा गंडा

जय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई

 

सरकारी महामंडळावर मोठं पद देण्याची थाप मारून माजी आमदाराच्या मुलाला कोट्यवधींचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

 

याप्रकरणी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी आमदार विजय कांबळे यांच्या मुलाला हा गंडा घालण्यात आला आहे.

 

कांबळे यांच्या मुलाला आरोपी चव्हाण महाराज यांने विजय कांबळे यांना आपण केंद्रीय प्रदूषण मंडळ किंवा केंद्रीय अन्न सुरक्षा मंडळावर वाशीला लावून मोठं पद देण्याचं

आमिष दाखवलं होते.

 

यासाठी चव्हाण महाराज याने कांबळे याच्या मुलांकडून १ कोटी ७ लाख रुपये ही उकळले होते.आपली सर्व खासदार आणि आमदारांसोबत चांगली ओळख असल्याचं ही या

चव्हाण महाराजने सांगितलं होते.

 

याच त्याच्या भूलथापांना बळी पडून कांबळे यांच्या मुलाची फसगत झाली. मात्र, आपली फसगत झाल्याचं लक्षात येताच चव्हाण महाराज यांच्या विरोधात कामोठे पोलीस

ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version