नुकताच 2 डिसेंबर रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता महापालिका निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने 15 डिसेंबरला पत्रकार परिषद घेऊन ठाण्यासह महाराष्ट्रातील दीर्घकाळ रखडलेल्या 29 महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा केली आहे. याचपार्श्वभूमिवर राज्यभरात सर्व राजकीयपक्ष लगबगीला लागले आहेत. अशातच भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे. मुंबईत ठाकरेंच्या लागलेल्या फलकावर आशिष शेलार यांनी ट्वीट करत चिमटा काढलेला आहे.
मराठी माणसाने तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला आहे. होर्डिंग लावून कोण तरी मराठी माणसाला उठवतोय. लबाड बोक्यांनो तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय. आता तारीख ठरली…वार ही ठरला असं म्हणत आशिष शेलार यांनी ठाकरेंना खोचक टोला लगावला आहे. तर दुसरीकडे आज मुंबई महापालिकेच्या जागावाटपासाठी पहिली बैठक पार पडणार आहे. आज भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात दुपारी 2.00 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
तसेच भाजपकडून मुंबई अध्यक्ष अमित साटम, निवडणूक प्रभारी आशिष शेलार, आमदार अतुल भायखळकर आणि आमदार प्रविण दरेकर उपस्थित राहणार आहेत. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे, रविंद्र वायकर, प्रकाश सुर्वे, शीतल म्हात्रे चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचसोबत मुंबईत भाजप 150 जागा लढण्याच्या तयारीत तर सेनेकडूनही शंभर जागांवर दावा करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
यावेळी भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्वीट करत म्हटल की,
“मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला !!
मुंबईचे मारेकरी कोण?
मराठी माणसाला आता कळून चूकलेय
त्याने मुंबईला वाचवायचेय स्वतःच ठरवून ठेवलेय!
डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्षे खा.. खा.. खाल्ले
राजकीय स्वार्थासाठी
मराठी माणसाला वापरले
आता यांना मराठी माणूस आठवतोय
जागा हो… म्हणून होर्डिंग लावून कोण तरी मराठी माणसाला उठवतोय !
तो तर जागाच आहे.. उघड्या डोळ्याने बघतो
अरे लबाड बोक्यांनो तुम्हाला हरवण्याची संधी शोधतोय
आता तारीख ठरली…वार ही ठरलां
मराठी माणसाने तुम्हाला हरवण्याचा शुभ मुहूर्त काढला !!”
मराठी माणसाने शुभ मुहूर्त काढला !! मुंबईचे मारेकरी कोण?
मराठी माणसाला आता कळून चूकलेय
त्याने मुंबईला वाचवायचेय स्वतःच ठरवून ठेवलेय! डोळे मिटून यांनी पालिकेत 25 वर्षे खा.. खा.. खाल्ले
राजकीय स्वार्थासाठी
मराठी माणसाला वापरले
आता यांना मराठी माणूस आठवतोय
जागा हो… म्हणून… — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) December 16, 2025
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.